जिल्हा परिषद, परभणी
भरती प्रक्रिया - २०१५
 
कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.

सूचना

ऑनलाईन अर्ज करावयाची पध्दत:-

१. ऑनलाईन अर्ज http://exams.chanakyasoft.in/zpparbhani या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदरच्या संकेतस्थळावर लॉगीन करुन दिलेल्या सुचनांप्रमाणे आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावेत अथवा त्याबाबत काही मदतीची आवश्यकता असल्यास जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे Chanakya Software Services Pvt. Ltd. Pune च्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा. सदरच्या अधिकृत केंद्राचा email.ID zpparbhani2015@gmail.com किंवा ८८०५००४२५७ या क्रमाकांवर संपर्क साधावा.

२. माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यावी. ती आपल्या माहितीसाठी जतन करुन ठेवावी. अर्जादाराने नियमितपणे वेबसाईट पहावी. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत प्रिंट काढून जिल्हा परिषद परभणी किंवा Chanakya Software Services Pvt. Ltd. Pune ला पाठविण्याची आवश्यकता नाही. लेखी परिक्षेत ओळखपत्र परिक्षेपुर्वी तुमच्या लॉगीनमध्ये व वेबसाईटवर उपलब्ध राहील. यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

३. पदासाठी असणारी किमान अर्हता आणि पात्रता धारण करणा-या व लेखी परिक्षेत पात्र ठरणा-या उमेदवारांना या पदासाठी घेण्यात येणारी परिक्षेत रुपरेषा, वेळापत्रक, परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादींबाबतची माहिती http://exams.chanakyasoft.in/zpparbhani या संबंधीत Website वर वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाईल.

४. जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार, मार्गदर्शन केंद्र, परभणी/ कौशल्यविकास या कार्यालयात व आदिवासी विकास विभागाकडे नाव नोंदणी केली असली तीर वरील पदासाठी स्वतंत्रपणे रितसर Online अर्ज करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.

५. उमेदवारांनी अर्जासोबत माहिती सादर करतांना सतत कार्यान्वित असलेला अचुक भ्रमणध्वनी (Mobile Cell Phone) क्रमांक व ई-मेल आय. डी. नमुद करावा जेणेकरुन आपणास संपर्क करुन आवश्यक ती माहिती देणे सुलभ होईल.

६. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि आवश्यक आवेदन शुल्क अदा केले आहे व संपूर्ण माहिती भरुन प्रिंट काढलेली आहे तसेच जे उमेदवार पदाच्या पात्रतेनुसार पात्र ठरले आहेत त्यांना दि. १९/११/२०१५ पासुन लेखी परिक्षेचे परिक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket/Admit card) त्यांचा लॉगीन आय.डी. वरुन किंवा http://exams.chanakyasoft.in/zpparbhani या संकेतस्थळावरुन Download करता येईल.

७. परिक्षा केंद्रावर ओळखपत्रासह परिक्षा सुरु होण्यापुर्वी एक तास अगोदर उपस्थित रहाणे आवश्यक आहे, उशिरा येणा-या व प्रवेशपत्र न आणणा-या उमेदवारांना परिक्षेकरीता प्रवेश दिला जाणार नाही. तसेच उमेदवाराने स्वताचे फोटो असलेले ओळखपत्र उदा. वाहन परवाना, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ. सोबत आणावे.

८. लेखी परिक्षेचे प्रश्नपत्रिकेची उत्तर तालिका (Answer Key) वेबसाईटवर प्रसिध्द झालेनंतर उमेदवारांनी हरकत असेल तर जिल्हा परिषद परभणी तक्रार निवार संकेतस्थळावर, अथवा zppzrbhzni2015@gmail.com अथवा हस्तवटवडयाद्वारे उत्तरतालिका प्रसिध्द झालेनंतर ३ दिवसाचे आंत सादर करावी मुदतीनंतर प्राप्त हरकतीचा विचार केला जाणार नाही.

९. लेखी परिक्षेचा निकाल http://exams.chanakyasoft.in/zpparbhani या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

१०. पदांची उपलब्ध संख्या व समांतर आरक्षण विचारात घेता लेखी परिक्षेत गुणवत्तेच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांची यादी - http://exams.chanakyasoft.in/zpparbhani च्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल व जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. याबाबत उमेदवारास कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय अंतिम निवड ग्राह्य धरण्यात येणार नाही.

११. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत काही अडचणी आल्यास त्यानी ८८०५००४२५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

१२. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुंटुबाचे प्रमाणपत्र) नियम २००५ मधील ४ मधील तरतुदीनुसार कुंटुबात दि. २७-०३-२००५ नंतर जन्मलेले दोन पेक्षा जास्त अपत्य नाहीत याबाबतचा नमुना-अ मधील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

१३. परीक्षा शुल्क भरण्याची सोय ही SBI बँकेत चलना मार्फत (बँक चलन) किंवा Online Payment मार्फत करण्यात आली आहे. त्यांची सविस्तर माहिती http://exams.chanakyasoft.in/zpparbhani या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.